Skip to main content

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता Lyrics



तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा 
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ||धृ || 

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्ष 
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||

पहा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ 
गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ 
करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता.... || २ || 

नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे  
हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे 
सेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता..... || ३ ||

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संसारकी आँधी में, बह जानेका डर है

  संसारकी आँधी में, बह जानेका डर है (तर्ज : अब जाग उठो भाई...) संसारकी आँधी में, बह जानेका डर है ।।टेक।। विषयोंकी हवा छूटी, अँखियोंमें पडी धूली । मम़ताकी उडी काँटी, सब बदन चुभी खुली ।। इस क्रोधकी बिजलीसे, जल जानेका डर   है ।।१।। इस अहंकार ने मन पागलसा बना डाला ।  ना समझ रही थोडी, दे दिया अजब प्याला ।। ना राह मिली सीधी, ढल जाने   का   डर   है ।।२।। गुरुदेव के चरणों में यहि अर्ज हमारी है । भूले ना हम तुमको, हम दरपे भिखारी है ।। तुकड्या कहे बिन प्रभूके, मर जानेका डर है ।।३।।

खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या

खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या Lyrics (चाल: रुसलासी हरी का बरे...) खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहनी ।।धृ0।। भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऐकता । रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।१।। जात होती यमूनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी । माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।२।। दास तुकड्या म्हणे ही लिला, देव गोकुळासी खेळला । उद्धरील्या सख्या गोळणी,राधिकेच्या मना मोहुनी ।।३।।

असा कसा देवाचा देव Asa Kasa Devacha Dev Lyrics | Sant Eknath

असा कसा देवाचा देव Asa Kasa Devacha Dev Lyrics | Sant Eknath असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥ एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥