Skip to main content

हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे

 

हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे

(चाल: रसने ! न राघवाच्या...)
हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे ।
तुटतील बंध सारे, भव-पाश या जिवाचे ।।धृ0।।
मन लावुनी विचारी, धरि एकनिष्ठ तारी । ॒ 
निष्काम गा मुरारी, अति हर्षे देव नाचे ।।१।।
नच जाइ पुण्यधामा, बस रे ! करीत कामा ।
कामात लक्ष रामा-वरि, ठेव  अंतरीचे  ।।२।।
सोडूनि कल्पना ही निंदा-स्तुती जगाची ।
रंगोनि एकभावे, सुख  घे  हरी - पदाचे ।।३।।
तुकड्या म्हणे ही वेळा, साधूनि घे फुकाची ।
अनमोल जन्म जाता, मग मार त्या  यमाचे ।।४।।

Comments

Popular posts from this blog

संसारकी आँधी में, बह जानेका डर है

  संसारकी आँधी में, बह जानेका डर है (तर्ज : अब जाग उठो भाई...) संसारकी आँधी में, बह जानेका डर है ।।टेक।। विषयोंकी हवा छूटी, अँखियोंमें पडी धूली । मम़ताकी उडी काँटी, सब बदन चुभी खुली ।। इस क्रोधकी बिजलीसे, जल जानेका डर   है ।।१।। इस अहंकार ने मन पागलसा बना डाला ।  ना समझ रही थोडी, दे दिया अजब प्याला ।। ना राह मिली सीधी, ढल जाने   का   डर   है ।।२।। गुरुदेव के चरणों में यहि अर्ज हमारी है । भूले ना हम तुमको, हम दरपे भिखारी है ।। तुकड्या कहे बिन प्रभूके, मर जानेका डर है ।।३।।

खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या

खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या Lyrics (चाल: रुसलासी हरी का बरे...) खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहनी ।।धृ0।। भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऐकता । रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।१।। जात होती यमूनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी । माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।२।। दास तुकड्या म्हणे ही लिला, देव गोकुळासी खेळला । उद्धरील्या सख्या गोळणी,राधिकेच्या मना मोहुनी ।।३।।

असा कसा देवाचा देव Asa Kasa Devacha Dev Lyrics | Sant Eknath

असा कसा देवाचा देव Asa Kasa Devacha Dev Lyrics | Sant Eknath असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥ एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥